बांदा येथील श्री देव बांदेश्वर मंदिराच्या कलशारोहणाच्या सातव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन झाले सुनिश्चित.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा वासियांचे आराध्य व जागृत श्री देव बांदेश्वर मंदिराच्या कलशारोहणाच्या सातव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक १७ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता श्री गणेश पूजन, देवतास नारळ, विडे अर्पण करून समुदाईक गाऱ्हाणे, सकाळी ८.३० ते १० वाजता श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक अनुष्ठान, श्री देवी भूमिका मंदिरात श्री सूक्त आवृत्ती अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवृत्ती जप अनुष्ठान, दुपारी १.३० वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ या वेळेत स्थानिक मंडळाची भजने, रात्री ९ ते १२ या वेळेत पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
या दिवशी सोमवार असल्याने मंदिरात इतर कोणतीही वैयक्तिक धार्मिक विधी संपन्न होणार नाहीत. ज्या भक्त गणांना महाप्रसादासाठी वस्तुरूप देणगी द्यायची असेल त्यांनी दिनांक १४ एप्रिल पर्यंत मंदिराच्या कार्यालयात जमा करावी. या सोहळ्याचा व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर भूमिका देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)