ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड कार्यकारणीही बिनविरोध फेरनिवड
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड कार्यकारणीही बिनविरोध फेरनिवड

प्रकाशन: 08 Apr 2023 03:32 PM
वाचन संख्या 75

देवगड तालुका पत्रकार समिती आदर्शवत काम करेल; नुतन अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांचा विश्वास

संतोष साळसकर | शिरगांव: देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड झाली असून तालुका कार्यकारणीचीही बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.देवगड तालुका पत्रकार समितीची निवडणुक प्रक्रिया डायमंड हॉल येथील सभागृहात निवडणुक निरिक्षक महेश सरनाईक आणि महेश रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या निवडणुकीमध्ये उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने अयोध्याप्रसाद गावकर यांनी बिनविरोध निवड केली असून कार्यकारणीमधील उपाध्यक्षपदी दयानंद मांगले, अनिल राणे, सचिवपदी सचिन लळीत, खजिनदारपदी श्रीकृष्ण रानडे, सहसचिवपदी महेश तेली आणि कार्यकारणी सदस्य म्हणून प्रशांत वाडेकर, सुरज कोयंडे, संतोष कुळकर्णी, गणेश आचरेकर व राजेंद्र साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडणुकीला जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र मुंबरकर , राजू पडवळ, साईनाथ गावकर, विश्वास मुणगेकर, शंकर मुणगेकर, संतोष साळसकर, प्रदीप घाडी, स्वप्नील लोके, दिनेश साटम, वैभव केळकर, बी.के.चव्हाण आदी उपस्थित होते.अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध फेरनिवड जाहीर होताच त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी नुतन अध्यक्ष अयोध्याप्रसाद गांवकर यांनी आपली अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड केल्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करून देवगड तालुका हा वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा पोंभुर्ले ही जन्मभुमी असलेला तालुका असून देवगड तालुका पत्रकार समितीने संपूर्ण कार्यकारणीची एकमताने बिनविरोध निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करून पत्रकार सहकाèयांनी आपल्यावर पुन्हा दिलेली अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सार्थकी लावून देवगड तालुका पत्रकार समिती पुढील दोन वर्षात सर्वांच्या सहकार्याने आदर्शवत काम करेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी निवडप्रक्रियेला उपस्थित राहीलेले निवडणुक निरिक्षक महेश सरनाईक व महेश रावराणे यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स