ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीत प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या…
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडीत प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या…

प्रकाशन: 08 Apr 2023 03:45 PM
वाचन संख्या 308

सहसंपादक/नवलराज काळे:- लोरे हेळेवाडी येथील प्राथमिक शिक्षक राजा बिरू गाडीकर वय 43 यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी फणसाचा माळ येथे ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण नेमके समजू शकले नाही. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकाच्या आत्महत्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. राजा गाडीकर हे मूळचे चांदोरी तालुका निलगा जिल्हा लातूर येथील होते. गेले अनेक वर्ष ते वैभववाडी तालुक्यात ज्ञानदानाचे काम करत होते. यापूर्वी त्यांनी विद्यामंदिर अरुळे, कुर्ली केंद्र शाळा येथे सेवा बजावली होती. सध्या ते लोरे हेळेवाडी येथील शाळेवर कार्यरत होते. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्नी संगीता हिला मला कंटाळा आलाय मी जरा बाहेर जाऊन येतो असे सांगून ते घराबाहेर पडले होते. त्यानंतर सायंकाळी 4:20 वा. सुमारस पत्नीला त्यांनी फोन करून आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो तिथे तू सायंकाळी वाजण्याच्या सुमारास पाणी घेऊन ये असे सांगितले. त्याप्रमाणे पत्नी सायंकाळी सहा वा.च्या सुमारास फणसाचा माळ येथे पाणी घेऊन गेली होती. यावेळी गाडीकर यांनी झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. पत्नी संगिता गाडीकर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स