ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम  अखेर एन्. पी.एस्. मध्ये वर्ग प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या  सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम अखेर एन्. पी.एस्. मध्ये वर्ग प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश

प्रकाशन: 05 Apr 2023 10:44 PM
वाचन संख्या 44

मसुरे | प्रतिनिधी: अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम एन. पी.एस. मध्ये वर्ग करण्यासाठी प्राथमिक शिक्षक भारतीने गेली एक वर्ष केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंशदायी पेन्शन योजनेतील शिक्षकांच्या हिशोब तक्त्यातील तफावत दूर करण्यासाठी शिक्षक भारती गेले चार वर्षे सतत प्रयत्नशील होती.त्यामुळे शिक्षकांच्या जमा रकमेतील तफावती दूर झाल्या असून शिक्षकांना अद्यावत हिशोब तक्ते देऊन त्यांची सर्व रक्कम नवीन एन्. पी.एस् खाती वर्ग करण्यात आली आहे. या मागणीचा गेले वर्षभर सातत्यपूर्ण सतर्क राहून पाठपुरावा करण्यात आला.गेल्या चार वर्ष संघटनेच्या वतीने मा.मुख्यकार्यकारी अधिकारी,मा.उपमुख्यकार्यकारी अधिकारी,मा.शिक्षणाधिकार, मा.वित्त व लेखाधिकारी,उपवित्त व लेखाधिकारी ,यांची सातत्यपूर्ण भेट घेऊन व निवेदन देऊन चर्चा करण्यात येत होती.तसेच फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनातील मागणीत ही हा विषय संघटनेमार्फत लावून धरलेला होता .तसेच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यानी जुलै २०२२ मध्ये आयोजित केलेल्या सर्व संघटनाच्या सभेमध्येही हा विषय संघटनेमार्फत मांडण्यात आला होता.याची मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यानी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.त्याप्रमाणे आज एन्. पी.एस् धारक शिक्षकांच्या खाती त्यांची अंशदायी ची रक्कम वर्ग करण्यात आली त्याबद्दल मा.मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर साहेब ,मा.उपमुख्यकार्यकारी राजेंद्र पराडकर, मा.शिक्षणाधिकार महेश धोत्रे , मा.वित्त व लेखाधिकारी वल्लरी गावडे ,मा. उपवित्त व लेखाधिकारी श्री आरोंदेकर , शिक्षण विभाग लेखाधिकारी विनोद राणे , शिक्षण विभाग कनिष्ठ लिपिक सत्यवान सावंत यानी जे सहकार्य केले त्याबद्दल संघटनेमार्फत त्याना धन्यवाद देण्यात येत आहेत. तसेच यासाठी सदैव तत्पर राहून सहकार्य करणारे संघटनेचे कार्यालयीन सचिव दिनकर शिरवलकर यांचे विशेष आभार संघटनेच्या वतीने मानण्यात आले आहेत. हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तो सोडवण्यासाठी शिक्षक भारतीने जो पाठपुरावा केला त्याबद्दल एन्. पी.एस् धारक शिक्षकांनी शिक्षक भारतीचे आभार व्यक्त केले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स