ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पिंगुळी येथून वन्यप्राणी मगरीची यशस्वी सुटका!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पिंगुळी येथून वन्यप्राणी मगरीची यशस्वी सुटका!

प्रकाशन: 30 Mar 2023 08:02 PM
वाचन संख्या 88

मसुरे | प्रतिनिधी: पिंगुळी येथील साई मंदिराचे नजीक भंगसाळ नदी पात्राला लागून वन्यप्राणी मगर बाहेर आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ धीरेंद्र चव्हाण यांनी दिली असता वनविभाग कुडाळ च्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत स्थानिक ग्रामस्थांचे मदतीने तिला यशस्वी रेस्क्यू केले.मादी जातीच्या 6 ते 7 वर्षे वयाच्या मगरीचे पशु वैद्यकीय अधिकारी यांचे कडून वैद्यकीय तपासणी करुन तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत आलेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री अमृत शिंदे यांनी दिली.वन्यजीव अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ मध्ये वर्गीकृत करणेत आलेल्या वन्यप्राणी मगर ही जलीय परिसंस्थेच्या सर्वोच्च स्थानी असून स्वछता दूत म्हणून तीचे अस्तित्व महत्त्वाचे असलेचे सांगून वन्यप्राणी मगर चा वावर असलेल्या भागातील नागरिकांनी पाण्याकडे पाळीव जनावरे घेऊन जाताना काळजी घेण्याचे तसेच नागरी वस्तीकडे वन्यप्राणी दिसून आल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देणेचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले. सदर बचाव मोहीम उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके, श्री धुळू कोळेकर वनपाल नेरूर त हवेली, श्री विष्णू नरळे वनरक्षक नेरूर त हवेली स्थानिक ग्रामस्थ संजय ठाकूर, गोट्या चव्हाण, अक्षय सावंत, बंटी ठाकूर, अमित सावंत,केदार भोसले,छोटू सावंत, निखिल सावंत, सचिन सावंत, ओमकार पालकर आदींनी यशस्वी केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स