ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मडुरा येथे २ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मडुरा येथे २ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

प्रकाशन: 30 Mar 2023 06:01 PM
वाचन संख्या 42

भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

बांदा /राकेश परब : श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सावित्री शंकर मंगल कार्यालय रोणापाल मडुरा तिठा येथे रविवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.सांस्कृतिक मंडळातर्फे गावात अनेक विविध उपक्रम राबविण्यात येतात. गावातील रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास भविष्यात मंडळातर्फे रक्त उपलब्ध होईल अन रुग्णाला योग्यवेळी रक्तपुरवठा करता येईल. या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली. तरी मडुरा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून रुग्णांना जीवनदान द्यावे असे आवाहन माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापालचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स