मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर येथे रामजन्म सोहळा उत्साहात!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम…. अशा नामघोषात मसुरे देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव भरतेश्वर मंदिरात भविकांच्या अपूर्व उत्साहात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.मसुरे गावचे ग्रामदैवत तसेच ३६० खेड्यांचा अधिपती जैन श्री देव भरतेश्वर मंदीरात रामनवमी उत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी ६ वा. श्रीची विधिवत पूजा अर्च्या करण्यात आली,९ते १२ या वेळेत पुरोहित श्री सुधाकर जोशी यांनी पुराण वाचन केले, श्री रामजन्म व कथा कीर्तन श्री शेखर पाडगावकर यांनी सादर केले. मध्यान्ह दुपारी १२ वा. रामजन्म सोहळा झाला. रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम! या नामघोषात परिसर मंत्रमुग्ध झाला होता. तदनंतर मंदिराच्या भोवताली श्रीची पालखी प्रदक्षिणा ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पार पडली. उपस्थित भविकांना मंडळाकडून प्रसाद म्हणून सुंठवडा व महाप्रसाद देण्यात आला.या कार्यक्रमाला गावचे मानकारी, ग्रामस्थ व दशक्रोशितिल हजारो भाविक उपस्थित होते.फोटो: मसुरे देऊळवाडा येथील श्री देव जैन भरतेश्वर मंदिर येथे पालखी सोहळ्यास भाविकांनी गर्दी केली होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)