सुप्रसिध्द भजन सम्राट श्री. प्रमोद सुतार बुवा यांचे दुःखद निधन..!
संगीत क्षेत्रातील अनमोल हीरा काळाच्या पडद्याआड…!
कणकवली | उमेश परब : सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रमोद सुतार ( रा.पोखरण वय ५१ वर्षे )यांचे शनिवारी सकाळी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. कोल्हापूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच पहाटे 5.30ला प्रमोद सुतार यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या जाण्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील अनमोल हिरा गमावल्याची भावना जिल्ह्यातून व्यक्त होत आहे. त्यांच्या आकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमोद सुतार यांनी अनेक नामवंत शिष्य घडविले आहेत. जिल्ह्य़ातील संगीत क्षेत्र आणि इतर सर्वच स्तरांतून भजनसम्राट सुतार यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)