कणकवली नगरपंचायतच्या वतिने गांधीजयंती साजरी..
आझ़ादीका अमृतमहोत्सव प्रकल्पाअंतर्गत केले गेले मार्गदर्शन
कणकवली | उमेश परब : कणकवली नगरपंचायत वतीने 2/10/public/uploads/2021 रोजी सकाळी 11 वाजता नगरपंचायतीच्या परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृह येथे गांधी जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव या सदरा खाली सफाई मित्र, स्वयंसहायता महिला बचत गट यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमात कणकवली शहरातील सर्व महिला बचत गट व नगरपंचयातीच्या आरोग्य विभाग , पाणी विभाग, विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना मा. नगराध्यक्ष श्री .समीर नलावडे व मा.श्री.उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
मागील आठवडा भर कणकवली नगरपंचयातीने मा.मुख्याधिकारी श्री. अवधूत तावडे व मा.आरोग्य सभापती श्री.अभिजीत मुसळे यांचा मार्गदर्शनाखाली आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कचरा वर्गीकरण बाबतीत अपार्टमेंट मधील नागरिकांना मार्गदर्शन करणे,सफाई कर्मचाऱ्यांची कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)