ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वाफोली ग्रामपंचायत व घे भरारी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिराला भरघोस प्रतिसाद.

वाफोली ग्रामपंचायत व घे भरारी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिराला भरघोस प्रतिसाद.

प्रकाशन: 22 Mar 2023 08:30 PM
वाचन संख्या 173

ख़ास वाफोली येथील महिलांसाठी आयोजीत आरोग्य शिबिर.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘वाफोली ग्रामपंचायत व घे भरारी ग्रामसंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने लव्ह विशेष वाफोली येथील महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन सोसायटी सभागृह वाफोली येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटक माजी आरोग्य सभापती श्री प्रमोद कामत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आरोग्य शिबिरा मध्ये महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सी.बी.सी.,थायरॉईड, कॅल्शियम, तसेच रक्तातील काविळीची तपासणी व त्यावरील उपचारासाठी मोफत औषधे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री उमेश शिरोडकर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.नेत्रा सावंत स्त्री रोगतज्ञ सावंतवाडी,डॉ.पुष्पलता मणेरीकर/सावळ (प्रा.आरोग्य उपकेंद्र विलवडे ) हे उपस्थित होते. यावेळी शिबिरासाठी येणाऱ्या सर्व महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. डॉ.नेत्रा सावंत यांनी उपस्थित महिलांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तब्बल १८० महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक श्री प्रसाद ठाकूर, कर्मचारी,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन वाफोली विकास सोसायटी चेअरमन सौ.धनश्री विलास गवस यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच श्री विनेश गवस यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स