ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न.

प्रकाशन: 22 Mar 2023 06:57 PM
वाचन संख्या 173

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या जागृत देवस्थान म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

दारू बंदीचा पुरस्कर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव मागील शुक्रवारी संपन्न झाला. श्री देव रवळनाथ मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी करीत श्रीं चे दर्शन घेतले तर सायंकाळपासून श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली रात्री गोंधळ उत्सवाची मांडणी झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी श्री देव रवळनाथ समोर गाऱ्हाणे घालीत नवस फेडले व बोलले तसेच महिला वर्गानी खण नारळाने ओट्या भरल्या.

यावेळी उपस्थित भाविकांनी श्री देवी भवानीचा उदो उदो करीत रात्रभर जागर मांडला या उत्सवाच्या निमित्ताने मसुरे डांगमोडे येथील अजित अनिल ठाकूर या युवकाने मंदिराचा गाभारा तसेच मंदिरात आकर्षक फुलांची लक्षवेधी सजावट केली होती तर वेरलीच्या श्री बाळा मेस्त्री यांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती . यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.

या उत्सवाच्या निमित्ताने नवतरुण मित्र मंडळाने कबड्डी व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते या कार्यक्रमास आमदार वैभव नाईक, हरी खोबरेकर, मंदार केणी, पंकज वर्दम व इतर मंडळींनी विशेष उपस्थिती दर्शविली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स