ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वैभववाडितील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात 'हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृह' उद्घाटन सोहळा २५ मार्चला..!

वैभववाडितील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात 'हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृह' उद्घाटन सोहळा २५ मार्चला..!

प्रकाशन: 23 Mar 2023 11:19 AM
वाचन संख्या 1694

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची असणार विशेष उपस्थिती ; आमदार नितेश राणे यांचीही असेल महत्वपूर्ण उपस्थिती.

विवेक परब (ब्युरो चीफ) आणि नवलराज काळे ( सहसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे ‘हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार रावराणे बंदिस्त प्रेक्षागृह उद्घाटन’ व खोरकर (अरुळेकर) रावराणे मंडळ चे ‘कै. सदाशिव गंगाराम रावराणे (वाभवे) शैक्षणिक संकुल’ नामफलक अनावरण तसेच खोरकर (अरूळेकर) रावराणे मंडळ, यांस ‘महाराणा प्रतापसिंह जीवन विकास केंद्र’ नूतन सभागृह हस्तांतरण सोहळा शनिवार २५ मार्च २०२३ ला सकाळी ९.३० वाजता आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संपन्न होणार आहे. या सोहळ्याला श्री. विनोद श्रीधर तावडे अध्यक्ष, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, , माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सरचिटणीस – भाजपा यांच्या हस्ते व श्री. प्रकाशकुमार विश्वास रावराणे व सौ. ज्योती प्रकाशकुमार रावराणे, श्री. भालचंद्र सदाशिव रावराणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. आमदार नितेश राणे यांचीही महत्वपूर्ण उपस्थिती असेल.

या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे आवाहन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, , खोरकर (अरूळेकर) रावराणे मंडळ, यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स