वायंगणीत युवासेनेच्या मोफत आरोग्य शिबीराला जबरदस्त प्रतिसाद..!
विवेक परब/ ब्यूरो चीफ : ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी, समर्थ प्रतिष्ठान व उध्दव ठाकरे युवासेना वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज मालवण तालुक्यातील श्रीकृष्ण मुरवणे हाँल वायंगणी येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. शिबिराला 80 रूग्णांनी लाभ घेतला. दंत चिकित्सा स्पेशालिस्ट डाँ. जूई देसाई, नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान डाँ. संजय जोशी, जनरल आरोग्य तपासणी डाँ. प्रणव प्रभू यांनी रूग्णांची तपासणी केली. तसेच रक्ताच्या सर्व तपासण्या कोकण विकास शिक्षण संस्था यांच्या कडून मोफत करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख उदय दुखंडे, उपसरपंच समृद्धी आसोलकर, शाखा प्रमुख दिनेश साळकर, माजी सरपंच संजना रेडकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, रामदास सावंत, समर्थ महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष स्वामिनी परब, सचिव दिपश्री राऊत, खजिनदार अश्विनी आसोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)