ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये रंगला बाळ गोपाळांचा 'ग्रॅज्युएशन डे..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये रंगला बाळ गोपाळांचा 'ग्रॅज्युएशन डे..!

प्रकाशन: 19 Mar 2023 01:14 PM
वाचन संख्या 330

मालवण/ नझीरा शेख: शनिवार दिनांक 18 मार्च या दिवशी मालवण मधील प्रसिद्ध शाळा रोझरी इंग्लिश स्कूल येथे पूर्व प्राथमिक वर्गातील मुलांचा ग्रॅज्युएशन डे उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोझरी इंग्लिश स्कूल, च्या माजी विद्यार्थिनी व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल च्या शिक्षिका श्रीम. प्रज्ञा कांबळी उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, मुले ही मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात. त्यांना आकार देण्याचे काम शिक्षक करतात. सध्याची पिढी खुप प्रगत आहे, नवीन गोष्टी मुले स्वत: शिकतात. त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची गरज आहे; ते वेळोवेळी त्यांना शाळेतून मिळत असते. रोझरी शाळेतील सर्व शिक्षक मुलांना कार्यरत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पूर्व प्राथमिक वर्गातून मुले आता प्राथमिक वर्गात पदार्पण करणार आहेत म्हणून त्यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक फा. ऑल्विन गोन्सालवीस, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्युनियर व सिनियर के. जी च्या मुलांनी विविध नृत्य आविष्कार सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढविली. फा. ऑल्विन यांनी मुलांचे पालक व शिक्षकांचेही कौतुक केले.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स