ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तोंडवळीत  मोफत आरोग्य तपासणी शिबीरात ५० व्यक्तिंची झाली तपासणी…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तोंडवळीत  मोफत आरोग्य तपासणी शिबीरात ५० व्यक्तिंची झाली तपासणी…!

प्रकाशन: 13 Mar 2023 03:16 PM
वाचन संख्या 91

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंडवळी ग्रामपंचायत व एस्. एस्. पी. एम. लाईफटाईम हाॅस्पिटल-पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने तोंडवळी ग्रामपंचायत येथे आज सोमवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात तोंडवळी मधील गरजू रुग्ण सहभागी झाले होते. ५० जणांची या शिबिरात मोफत तपासणी झाली. या शिबिराची सुरुवात तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर यांचा हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

एस्. एस्. पी. एम. लाईफटाईम हाँस्पिटल, पडवेचे डॉ. चिन्मय प्रभू, डॉ.संजय जोशी, कोमल सावंत, शिवानी राऊळ, डी, व्ही,धोत्रे या सारख्या तज्ञ डॉक्टराच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली.

या शिबिरात, मोफत हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी, कर्करोग तपासणी, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी, इ.सी.जी, बी.एस.एल, नेत्र तपासणी, बोन डीसीज, अस्थीरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा यांची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. या मोफत शिबिराला विकास लुडबे, विष्णू गोसावी यांचे सहकार्य लाभले.

यावेळी तोंडवळी उपसरपंच हर्षद पाटील, तोंडवळी ग्रामसेवक प्रकाश सुतार, ग्रामपंचायत सदस्या मानसी चव्हाण, अनन्या पाटील, सुजाता पाटील, नरेंद्र मेस्त, राजा पेडणेकर, अनिल वायंगणकर, प्रमोद पाटील, प्रणिता पेडणेकर, रमेश पाटील, निलेश तोंडवळकर, महेश नाईक, दिशा गोलतकर, श्रद्धा पाटील, दीपक पेडणेकर, अशोक पेडणेकर, पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स