ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
शूटिंगबॉल स्पर्धेत जयंत घोरपडे संघ (टेंभुर्णी ) सोलापूर विजेता.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शूटिंगबॉल स्पर्धेत जयंत घोरपडे संघ (टेंभुर्णी ) सोलापूर विजेता.

प्रकाशन: 13 Mar 2023 03:50 PM
वाचन संख्या 51

मसुरे | प्रतिनिधी : मुंबईतील भांडुप पश्चिम येथील पराग विद्यालयाच्या मैदानात आयोजित शूटिंगबॉल स्पर्धेत जयंत घोरपडे संघ (टेंभुर्णी ) सोलापूर संघाने एमबीपीटी मुंबई संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. माजी आमदार श्याम सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई शूटिंग बॉल असोसिएशनच्या मान्यतेने शुटिंग बाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई शूटिंग बाॅल असो.चे अध्यक्ष व माजी आमदार श्याम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नामवंत १८ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जयंत घोरपडे संघ टेंभुर्णी सोलापूर, या संघाने एम बी पी टी मुंबईचा २१-७ असा एकतर्फी विजय प्राप्त केला. टेंभुर्णी सोलापूर संघाला 7 हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तर एम बी पी टी मुंबई संघाला 5 हजार रुपये आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

आरमार विक्रांत हा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तर शासकीय दूध डेअरी पुणे हा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
या दोन्ही संघांना प्रत्येकी ३ हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली.
या स्पर्धेत एम .बी .पी .टी .या संघाचा भूषण मेस्त्री उत्कृष्ट खेळाडू ठरला तर सामनावीर म्हणून टेंभूर्णी संघांचा नाना चौगुले याची निवड झाली. या दोन्ही खेळाडूंना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.राजेश भाटिया व डॉ.वसंत दराडे यांनी केले.मुंबई शुटिंग बाॅल संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाला माजी आमदार श्याम सावंत, माजी आमदार अशोक पाटील ,पराग विद्यालयाचे संस्थापक संचालक बाळकृष्ण बने शेठ, मुंबई शूटिंग बाॅल संघटनेचे सेक्रेटरी दीपक सावंत ,खजिनदार प्रफुल्ल वाईरकर, स्पर्धा नियंत्रक मुंबईचे माजी कर्णधार रत्नदीप रावराणे, सहसचिव मिलिंद बिर्जे, पांडूरंग सुतार, चंद्रकांत नगरे, सुनील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स