बांद्यात 'मातृत्व' मेडिकल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा पत्रादेवी जुना रोड येथील मातृत्व मेडिकलमध्ये १६ मार्चला सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा बांबुळी हॉस्पिटलमध्ये सेवा बजावलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर दत्ताराम गवस यासाठी तपासणीसाठी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बांदा दशक्रोशीतील महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मातृत्व मेडिकलचे मालक विराज परब यांनी केले आहे.
शिबिरात गरोदर स्त्री तपासणी, व्यंधत्व, स्त्री रोग तपासणी, मासिक पाळीचे आजार, गर्भ पिशवीचे आजार, डॉक्टरांचा सल्ला तसेच मार्गदर्शन, समुपदेश, इतर आरोग्य तपासणी, शुगर तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
रक्त तपासणी आवश्यक असल्यास आस्था क्लीनिकल लॅब मार्फत खास सवलती मध्ये उपलब्ध होणार आहे. तरी महिलांनी याचा लाभ घेत आरोग्य सुदृढ बनवावे असे आवाहन विराज परब यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी विराज परब (9404214663, 9405299405), निलेश मोरजकर (9763717790), राकेश परब (9421189621), प्रवीण परब (9423213372), विश्वनाथ नाईक (9967214162) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)