ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कुडाळ भाजप महिला मोर्चाचा महोत्सव दणक्यात संपन्न ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कुडाळ भाजप महिला मोर्चाचा महोत्सव दणक्यात संपन्न ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 11 Mar 2023 04:40 PM
वाचन संख्या 271

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ भाजपा महिला मोर्चाचा महोत्सव अतीशय जल्लोषात व दणक्यात संपन्न झाला.
ढोलताशांचा गजर, आकर्षक वेशभूषा, पाककलेत बनलेल्या खाद्यपदार्थांचा घमघमाट, उखाण्यांत घेतलेली पतिराजांची नावं आणि एकाहून एक सरस नृत्याविष्कार अशा जल्लोषी वातावरणात भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा कुडाळ, यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महिला महोत्सव अविस्मरणीय ठरला.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला महोत्सवाचे आयोजन कुडाळ भाजपा कार्यालया समोरील भव्य पटांगणात करण्यात आले होते. ८ मार्च रोजी जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. नीता राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत महिलांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला तो कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील झुंजार महिला ग्रुप यांनी तर दुसरा क्रमांक मिळाला महापुरुष महिला मंडळ खालची कुंभारवाडी कुडाळ शहर यांना. उत्तेजनार्थ पारितोषिक वेंगुर्लेकर वाडी कुडाळ शहर यांनी पटकावले.

९ मार्चला सौ शर्वरी विश्वास मुंडले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिध्द विधीतज्ञ ऍड संग्राम देसाई यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले. त्यांनी सर्वांना महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यादिवशीही महिलांनी मोठ्या संख्येने विविध स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांचे बक्षीस वितरण त्यांच्या ऍड देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

महिलांसाठी खास आकर्षण ठरलेला “खेळ पैठणीचा” उत्स्फूर्तपणे संपन्न झाला त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला ते कुडाळ शहरातील कुंभार वाडी इथली सौ पूनम धर्मेंद्र सुतार यांनी तर द्वितीय क्रमांक पटकावला सांगिरडेवाडीच्या वैष्णवी विष्णू परब यांनी तर तुतिय क्रमांक मिळवला कुंभारवाडी ह्या ठिकाणच्या शवी संतोष कुंभार यांनी लकी ड्रॉ मध्ये रोहिणी मेस्त्री यांना प्रथम, विघ्नेश विक्रांत कामत द्वितीय आणि गायत्री परब यांना तृतीय क्रमांक मिळाला. पाककला स्पर्धेत सौ अपर्णा पोटफोडे प्रथम, सौ नेहा कडोलकर यांनी द्वितीय आणि सौ संजना परब यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

कार्यक्रमाचे निवेदन नागेश नेमळेकर यांनी आपल्या बहारदार शैलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. उत्साहपूर्ण वातावरणात महिलांनी या दिनाची मजा लुटली.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध विधी तज्ञ ऍड संग्राम देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ दीपलक्ष्मी पडते, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ संध्या तेरसे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालिका नीता राणे, जेष्ठ नेत्या अस्मिता बांदेकर, माजी नगरसेविका जेष्ठ उषा आठले, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, जिल्हा कार्यकरणी सदस्य आनंद शिरवलकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा पदाधिकारी बंड्या सावंत, ओरोस मंडल ता अध्यक्ष दादा साईल, सरचिटणीस विजयी कांबळी, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर, कुडाळ भाजपचे शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, शहराध्यक्ष ममता धुरी, नगरसेविका नयना मांजरेकर, कु चांदणी कांबळी, नगरसेवक अभिषेक गावडे, ऍड राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, सोशल मीडिया अध्यक्ष राजवीर पाटील, ऍड रीना पडते, माजी नगरसेविका अश्विनी गावडे, साक्षी सावंत, प्रज्ञा राणे, कुडाळ महिला मंडल अध्यक्ष आरती पाटील, महिला मोर्चाच्या अदिती सावंत, रेखा काणेकर, पिंगुळी महिला मोर्चा अध्यक्षा सौ साधना माडये, चेतन धुरी, राजेश पडते, राकेश नेमलेकर, कु सखू आकेरकर, प्राची आठले, तेजस्वी वैद्य, रचना नेरुरकर, मुक्ती परब, ममता कुंभार, विशाखा कुलकर्णी, ओरोस सुप्रिया वालावकर, अक्षता कुडाळकर, कु गायत्री पडते, कु श्वेता पेडणेकर युवा मोर्चाचे विश्वास पांगुळ, स्वरूप वाळके, आदी भाजपा महिला मोर्चाच्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स