ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगे शिमगोत्सवाची धुळवडीने सांगता ; पारंपरिक रोंबाट खेळ व घुमट वादन ठरले 'रंगसंगीत' आकर्षण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगे शिमगोत्सवाची धुळवडीने सांगता ; पारंपरिक रोंबाट खेळ व घुमट वादन ठरले 'रंगसंगीत' आकर्षण.

प्रकाशन: 11 Mar 2023 04:08 PM
वाचन संख्या 288

मसुरे | प्रतिनिधी : “क्षण रंगाचा आनंदाचा, सण हा होळीचा,
जमवुनी सोंगे दारी रंगला, खेळ शिमग्याचा….” अशाच सामाजिक व अध्यात्मिक अनुभूतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवी मंदिरात शिमगोत्सवाची सांगता
देवीची आरती व त्यानंतर गुलाल उधळून धुळवडीच्या कार्यक्रमाने शुक्रवारी सायंकाळी झाली.

मुणगे भगवती मंदिरामध्ये शिमगोत्सवाला होळी उत्सवाने सोमवारी सुरुवात झाली. सोमवारी दुपारी बांबरवाडी येथून होळी साठी पोपळीचे झाड देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच बारापाच मानकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आणण्यात आले.

सायंकाळी वाजतगाजत होळी उभारण्यात आली. गुरव यांच्याकडून होळीची विधीवत पूजा झाल्यानंतर आकार ठेवणे, नैवेद्य, गावघराचे गाऱ्हाणे, नारळ ठेवणे, गावकरांमार्फत गाऱ्हाणे घालून शिमगोत्सवाची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी ७ मार्च रोजी रात्री भगवती मंदिर व होळीजवळ पारंपरिक पद्धतीने कारिवणेवाडी, बांबरवाडी, लब्देवाडी, भंडारवाडी या मंडळांची खेळ व नाचगाणी, होळीजवळ कवळ पेटविणे, भगवती मंदिरात बांबरवाडी मंडळाचा तमाशा, तर तिसऱ्या दिवशी ८ मार्च रोजी गावांमध्ये खेळे खेळण्यास सुरुवात झाली.

चौथ्या दिवशी ९ मार्च रोजी रात्री होळीजवळ व भगवती मंदिरात रोंबाट खेळ व नाचगाणी, तर पाचव्या दिवशी १० मार्च रोजी दुपारी भगवती मंदिरात बांबरवाडी यांचा तमाशा, सर्व मंडळांची पारंपरिक रोंबाट खेळ, होळीजवळ रोंबाट, नवसफेड व नवीन नवस गाऱ्हाणी, भगवती मंदिरात रोंबाट, देवीच्या सभा मंडपात नाचगाणी, देवीची आरती व त्यानंतर गुलाल उधळून धुळवडीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता झाली. सांगता कार्यक्रम प्रसंगी घुमट वादन कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स