ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दुर्गवीर प्रतिष्ठानचा पुन्हा एक 'स्वराज्यकांक्षी' उपक्रम ; छत्रपती शिवजयंतीच्या औचित्याने किल्ले रामगडावर फडकला भगवा.

दुर्गवीर प्रतिष्ठानचा पुन्हा एक 'स्वराज्यकांक्षी' उपक्रम ; छत्रपती शिवजयंतीच्या औचित्याने किल्ले रामगडावर फडकला भगवा.

प्रकाशन: 11 Mar 2023 03:54 PM
वाचन संख्या 255

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या किल्ले रामगडवर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे छत्रपती शिवजयंती संपन्न झाली . यावेळी रामगडावर वास्तूफलक आणि भगवा झेंडा फडकवण्यात आला.
            
कार्यक्रमाची सुरुवात रामगड ग्रामस्थ भालचंद्र पवार यांच्या हस्ते गडपूजनाने झाली. तद्नंतर मालवण तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांच्या हस्ते मुख्य दरवाजा आणि पश्चिमेकडील बुरुजावर हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या भगव्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रगत विद्यामंदिर रामगडच्या विद्यार्थ्यांची उपस्थित लक्षणीय होती. उपस्थित सर्वांना संपूर्ण गडफेरी करत गड दाखविण्यात आला तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने केलेल्या संवर्धन कार्याची माहिती देण्यात आली.
              
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा मुख्य कार्यक्रम गणेश मंदिरात झाला. यावेळी रामगड सरपंच श्री. शुभम मठकर यांच्या हस्ते गणेशाचे तसेच शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सामुदायिक आरती, ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र, गारद यांमुळे वातावरण शिवमय झाले होते.
यावेळी आपदा मित्र टीम चे वैभव खोबरेकर, प्रज्ञा बागवे, तनुजा गोलतकर तसेच सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी बेसिक लाईफ सपोर्ट या विषयावर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी तहसीलदार पाटील  यांनी आपल्या मनोगतात दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रामगड किल्ल्यावर सुरू असलेल्या संवर्धन कार्याचे कौतुक केले. तसेच छत्रपती  शिवाजी महाराजांना फक्त देव्हा-यात बसवून देव करण्यापेक्षा मनुष्यरूपातील या युगपुरुषाने आपल्या कार्यातून कसे देवत्व प्राप्त केले आहे याचा प्रत्येकाने अभ्यास करत ख-या अर्थाने शिवविचार दैनंदिन व्यवहारात आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी तहसीलदार पाटील  यांजकडून उपस्थितांना लेखक गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.
              
या कार्यक्रमासाठी सुनील पवार, मंडल अधिकारी, उपसरपंच राजू जाधव, मोहन घाडीगांवकर, बंडू लाड, अमित फोंडके, रामगड हायस्कूलचे शिक्षक दिनेश सावंत, माजी सैनिक दत्तगुरु गावकर, महादेव घाडीगांवकर, अनिल राऊळ, पुर्वा राणे, धनश्री अडसूळ, महेश्वरी कुवळेकर, देवेंद्र घाडीगांवकर, देशमुख सर, सह्याद्री प्रतिष्ठाचे प्रकाश सावंत, योगेश संकपाळ, ऐश्वर्या घाडीगांवकर, मयूर बोंद्रे, दुर्गवीर प्रतिष्ठानचे रवींद्र रावराणे, प्रशांत वाघरे, प्रभाकर परब आणि दुर्गवीर सिंधुदुर्गचे सर्व दुर्गवीर उपस्थित होते.
         
दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील रामगड, भगवंतगड या किल्ल्यावर संस्थेचे काम चालते.  प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी दुर्गवीरांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाते. रामगड, भगवंतगडावर सातत्याने होत असलेल्या स्वच्छता मोहिमा, गडावरील कार्यक्रम व कार्यामुळे गड पुन्हा एकदा नावारुपास येत आहेत. आपणही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे साक्ष असणारे हे गडकिल्ले जपण्यासाठी दुर्गवीर सोबत सहभागी होण्यासाठी चैतन्य आरेकर  ९४२२८४९१४६ या क्रमांकाशी संपर्क साधून या शिवकार्यासाठी हातभार लावावा असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स