ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कुडाळ नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधातील पदांवर ४ कर्मचार्‍यांना सामावून घेण्यास मान्यता...

कुडाळ नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधातील पदांवर ४ कर्मचार्‍यांना सामावून घेण्यास मान्यता...

प्रकाशन: 01 Oct 2021 07:28 PM
वाचन संख्या 208

ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे. आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा

कुडाळ | ब्यूरो न्यूज: कुडाळ नगरपंचायतीमध्ये समावेशन न झालेल्या ३५ कर्मचाऱ्यांचे  नगरपंचायत मध्ये समावेशन करण्याची  मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यामागणी नुसार पहिल्या टप्प्यात ३५ पैकी ४ कर्मचार्‍यांचे समावेशन करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचार्‍यांच्या समवेशनाची कार्यवाही सुरू असून यासाठी आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये सचिन सुरेश म्हाडदळकर व राजाराम नारायण कुंभार यांना  लिपिक पदासाठी , पुंडलिक सहदेव होडावडेकर यांना व्हाल्ममन पदासाठी तर संजय कृष्णा टेंबुलकर यांना शिपाई पदासाठी अशा या ४ कर्मचार्‍यांना  कुडाळ नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधातील पदांवर सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

    कुडाळ नगरपंचायतची स्थापना होण्यापूर्वी कुडाळ ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात होती. या  ग्रामपंचायतमध्ये  सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी व इतर कार्यालयीन कार्मचारी असे मिळून ६० कर्मचारी कार्यरत होते. कुडाळ नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर यातील १४ कर्मचाऱ्यांचे समावेश न करण्यात आला नवता. तसेच ११ कर्मचारी निवृत्त व काही मयत झाले आहेत. तर उर्वरित ३५ कर्मचारी कार्यरत आहेत.परंतु या कर्मचाऱ्यांचे कुडाळ ग्रामपंचायत मधून कुडाळ नगरपंचायत  मध्ये समावेशन झालेले नाही याबाबत आमदार वैभव नाईक यांनी कर्मचार्‍यांसमवेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कर्मचारी समावेशनाबाबत २ ऑगस्ट २०२१ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत  एकनाथ शिंदे यांनी तात्काळ यावर  सकारात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. 
त्यानुसार नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबईचे सहायक आयुक्त  कैलास गावडे यांनी कोकण विभागीय प्रादेशिक उप आयुक्त यांना परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या १६ सप्टेंबर २०२१ रोजी सूचना दिल्या. त्यानुसार २१ सप्टेंबर २०२१ रोजी ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कोकण विभाग नगरपरिषद प्रशासन विभागीय आयुकत विलास पाटील यांनी आदेश निर्गमित करत ३५ कर्मचार्‍यांपैकी ४ कर्मचार्‍यांना कुडाळ नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधातील पदांवर सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स