ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवणात एकता मित्रमंडळ आणि रोटरी क्लबचे रक्तदान शिबीर संपन्न..

मालवणात एकता मित्रमंडळ आणि रोटरी क्लबचे रक्तदान शिबीर संपन्न..

प्रकाशन: 01 Oct 2021 07:06 PM
वाचन संख्या 129

स्वेच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून शाश्वत सामाजिक आरोग्य कटिबद्धतेचा उपक्रम..

मालवण | वैभव माणगांवकर : कोरोना व ‘कोविड 19’ काळा दरम्यान राज्यातील अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासू लागली. अचानक उद्भवलेल्या भयावह आरोग्य परिस्थितीनंतर अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू लागला. मोठ्या शहरांमध्ये रक्तदानशिबिरांची जागृती होऊन त्याला प्रतिसादही मिळू लागला तरिही आजसुद्धा देशातील लाखो रुग्णांना,रुग्णालयांना आणि रक्तपेढ्यांना रक्ताची टंचाई भासत आहे.
मालवण बाजारपेठ येथील एकता मित्रमंडळातील कार्यकर्त्यांनी या आणिबाणिच्या सामाजिक पार्श्वभूमीवर स्वेच्छिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले. त्यांच्यासोबत रोटरी क्लब मालवणनेही समान सहकार्याचा वाटा उचलला.
मालवण बाजारपेठ येथील  एकता मित्रमंडळ आणि रोटरी क्लब मालवण यांनी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त ओरोस ब्लड बँकेच्या मागणी नुसार आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रातदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिवस अगदी समाजभानाने साजरा केला .

या रक्तदान शिबिराचे उदघाटन मालवण तहसीलदार श्री अजय पाटणे  यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर , नगरसेविका आकांशा शिरपुटे , माजी उपनगराध्यक्षा शर्वरी पाटकर , माजी नगरसेवक उत्तम पेडणेकर  , रोटरी क्लब अध्यक्ष ऊमेश सांगोडकर , अमेय देसाई , रतन पांगे , गुरुनाथ नाईक , चाचा हडकर , राजेश कोवळे , सुहास ओरसकर , संजय गावडे, अभय कवटकर , मंदार ओरसकर , ऍड ऋषिकेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते .
मा.तहसीलदार आणि नगराध्यक्ष आणि आरोग्य अधिकारी मालवण यांनी मनोगत व्यक्त केले सध्या तापाच्या साथीचे रोग जास्त असल्याने आणि रक्ताची गरज प्लेटलेट्स वगैरे कमी होण्यामुळे ब्लड बँक मध्ये रक्ताचा साठा कमी होत आहे आणि या अशा परिस्थितीत आणि लसीकरण झाल्याने रक्तदाते मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे कौतुक केले आणि शिबिरास शुभेच्छा दिल्या .या शिबिराला मालवण आरोग्य अधिकारी बालाजी पाटील तसेच मातृत्व आधार फाऊंडेशनचे संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर आणि डॉ. साळवी यांनी भेट दिली.
रक्तदान शिबिरास 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर काही रक्तदाते बीपी हिमोग्लोबिन लसीकरण या कारणांमुळे रक्तदान करू शकले नाहीत .
ओरोस ब्लड बँक येथे सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून वेळो वेळी रक्तदाते स्वखर्चाने जाऊन रुग्णांना रक्ताची असलेली गरज भागवतात तर कधी कधी ओरोस ब्लड बँकेच्या मागणी नुसार रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात तसेच नवीन शिबिरे घेणाऱ्यांसाठी मदत मार्गदर्शन करून प्रोत्साहन देऊन गावागावात शिबिरे आयोजित करून नवीन नवीन रक्तदाते करण्याचे काम ग्लोबल रक्तदाते मालवण समूहा कडून केले जाते त्याच प्रमाणे याही शिबिरास ग्लोबल रक्तदाते मालवण समूहाचे विशेष सहकार्य लाभले .
तसेच धक्का मित्रमंडळाचे बाबू डायस , गौरेश कांबळी , भूषण पिसे यांचेही सहकार्य लाभले
रक्त संकलन रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग
डॉ. योगेश गोडकर -वैद्यकिय अधिकारी
श्री.सुनिल बागवे- रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी
श्री. किशोर नांदगावकर- वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
श्री. नितिन गांवकर- वाहन चालक
श्री. नंदकुमार आडकर- परिचर
श्री. धाकु जाधव- वाहन मदतनीस
यांनी त्यांची सेवा दिली.
शिबिर यशस्वीतेसाठी  विद्याधर मेस्त्री , हितेंद्र हिर्लोस्कर , ललित मेस्त्री , केदार देसाई , ऍड.रोहित गरगटे , तुषार मेस्त्री , मिलिंद कडू , वैभव मेस्त्री , संदीप पेडणेकर , विजय पांचाळ , राजा शंकरदास , अंकित कोवळे ,नभिराज वणकुद्रे , रोहित पाटकर,  शैलेश मालांडकर , महेंद्र पारकर , ऊमेश हर्डीकर , दर्शन गावकर , आशा देसाई , रतन देसाई , अपूर्वा देसाई , किरण देसाई , यथार्थ कडू  यांनी विशेष मेहनत घेतली .

एकता मित्रमंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे आणि रोटरी क्लब मालवणच्या सक्रीय सहभागाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अनेक सामान्य नागरीक आणि महनीय व्यक्तींनीदेखिल या रक्तदान शिबिराबद्दल आयोजकांचे सामाजिक आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स