ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
फटोबा पडवणे संघाने मारली बाजी..! (नवलराज काळे क्रीडा इनिंग)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

फटोबा पडवणे संघाने मारली बाजी..! (नवलराज काळे क्रीडा इनिंग)

प्रकाशन: 22 Feb 2023 07:38 PM
वाचन संख्या 231

सुप्रसिद्ध देवगड तालुका मर्यादित पेंढरी बॉईज आयोजित “पेंढरी चषक २०२३ क्रिकेट ओव्हरर्म्स  .

सहसंपादक/नवलराज काळेदेवगड तालुक्यातील पेंढारी येथील रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती उत्सव” या आनंदी उत्सवाच्या मुहूर्तावर भरविण्यात आलेली देवगड तालुका मर्यादित पेंढरी बॉईज आयोजित “पेंढरी चषक २०२३ क्रिकेट ओव्हरआर्म्स स्पर्धा” अगदी थाटामाटात विरार चंदनसार येतील सुप्रसिद्ध अश्या तपस्या मैदानावर पार पडली. देवगड तालुक्यातील अगदी मोजक्या १६ बलाढ्य क्रिकेट संघांमध्ये या दिवशी चुरशीची रंगत पाहायला मिळाली. बसण्याची आसन व्यवस्था, साउंड व्यवस्था यांचे शिस्तबद्ध नियोजन आयोजन या वेळी पेंढरी बॉईज संघातील खेळाडूंनी केलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या वेळीची हि स्पर्धा थेट यु-ट्यूब लाईव्ह वर दाखविण्यात आली. बहुचर्चित, अल्पावधीत नावारूपाला आलेली हि क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी हजारो क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती दाखविली.


हि स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूने अहोरात्र मेहनत घेतली. सर्व मुलांना पाठबळ देण्यासाठी / मुलांचे मनोध्येर्य वाढविण्यासाठी / मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या वेळी प्रत्यक्ष गावावरून २० ते २५ प्रतिष्टीत गावकरी उपस्थित राहिले होते. पेंढरी ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. अनंत गुरव, गावचे सरपंच श्री. मंगेश आरेकर  श्री. संजय घाडी, पेंढरी माध्यमिक शाळेचे मुख्यध्यापक श्री. लाडगावकर सर, श्री. दत्ताराम तिर्लोटकर, श्री. सत्यवान मनचेकर आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली.
पेंढरी चषक २०२३ या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटविण्याचा सलग दुसऱ्या वर्षीचा मान फटोबा पडवणे या संघाला मिळाला. तर दुसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे मेन रोड गिर्ये व विग्नहर्ता वरंडवाडी या संघाना समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट बॉलर निनाद – मेन रोड गिर्ये आणि उत्कृष्ठ बॅट्समन हरीश जाधव पडवणे यांची निवड करण्यात आली. यावेळी सेमी फायनल संघांमधील खेळाडूंसाठी बॉलर, सिक्सर आणि बॅट्समन अशी तीन मेडल्स वितरित करण्यात आली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विपुल श्राफ आणि धनंजय जाधव यांनी तर समालोचक म्हणून पेंढरी बॉईज संघातील अष्टपैलू खेळाडू श्री. प्रकाश झोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स