ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आडवली समर्थगड येथे नृत्य स्पर्धा..!

आडवली समर्थगड येथे नृत्य स्पर्धा..!

प्रकाशन: 22 Feb 2023 02:34 PM
वाचन संख्या 85

२४ मार्च रोजी एकेरी नृत्य  व २७ मार्च रोजी समूहनृत्य स्पर्धा!

ब्यूरो चिफ- विवेक परब : मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ, समर्थगड-आडवली येथे२३ मार्च ते ३० मार्च २०२३ या कालावधीत श्री स्वामी जयंती उत्सव निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ मार्च रोजी रात्री ९.०० वा. जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ७ हजार रुपये, ५ हजार रुपये, ३ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रत्येकी सन्मान चिन्ह तसेच उतेजनार्थ क्रमांकाना पारितोषिक देण्यात येणार आहे.  २७ मार्च रोजी रात्री ९.०० वा. जिल्हास्तरीय समुहनृत्य स्पर्धा होणार आहे. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे १५ हजार रुपये, १२ हजार रुपये, ९ हजार रुपये रोख पारितोषिक व प्रत्येकी सन्मानचिन्ह आणि उतेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी सिताराम सकपाळ(९४२०२१०२६२), प्रकाश यशवंत गवस(९४०३३५०८४९), अतुल रमेश घाडीगांवकर(९४२११७४१३३), समीर भागोजी घाडीगांवकर (९३५९५०८१२१) येथे संपर्क साधावा.असे आवाहन श्री स्वामी समर्थमठ,समर्थगड-आडवली यांनी केले आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स