पी.के डान्स क्रू च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…!
कुडाळ.पी.के डान्स क्रू च्या विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत दणाणून सोडला परिसर
ब्यूरो चिफ/ विवेक परब-
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला, शेकडो वर्षाची काळरात्र चिरून, स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसुर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय आज त्यांची 393 व्या जयंतीनिमित्त कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी नगर ह्या ठिकाणी पी.के डान्स क्रू वतीने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अपूर्ण करून सर्व विद्यार्थी यांनी अभिवादन केलं. त्यावेळी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
त्यावेळी कुडाळ पी.के डान्स क्रू व फिटनेस स्टुडिओ कुडाळ डान्स कोरिओग्राफर सर्वेसर्वा प्रसाद कमतनूरे सुमन चव्हाण,अंकिता चव्हाण,आदित्य भारद्वाज, रुत्वी चिंदरकर, आर्या फोनडेकर, अर्ध्या बांदेकर, ईशान बांदेकर, कुंजल पवार, कनका परुळेकर, नेपाळी रावले, श्रद्धा सावंत, सारा गांगर्डे पाटील, स्वार नाईक, समीक्षा गवस, उर्वी कुंभार, स्वारा म्हाद्गुत, आर्या म्हाद्गुत, वैष्णवी परब, तेजश्री कुडाळकर,भूमिका कुडाळकर, श्रुष्टी कुडाळकर,आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)