ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बांदा शहरात शिवप्रेमी च्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदा शहरात शिवप्रेमी च्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 19 Feb 2023 10:57 PM
वाचन संख्या 71

बांदा /राकेश परब : बांदा शहर व परिसरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थ‍ान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाली. बांदा नगरी भगवी झालेली पाहायला मिळाली. ‘जय भवानी,जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.  

  कट्टा कॉर्नर ते गडगेवाडी दरम्यान डोलपथकासह भव्य रॅली काढण्यात आली.स्थानिक युवती व महिलांनी लेझीम नृत्ये सादर केली.परिसरात पारंपरिक वेशभूषेत आबालवृद्धांसह महिला व तरुण या सोहळ्यात सहभाग घेतला.    यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब,माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगांवकर, ग्रामपंचायत सदस्य शाम मांजरेकर, बाळू सावंत, मकरंद तोरसकर, बांदा मराठा सचिव महादेव सावंत, खजिनदार राकेश परब, राजा सावंत, बांदा पोलिस निरिक्षक शामराव काळे व शिवप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते. बांद्यात निमजगा वाडी, श्रमित मित्र मंडळ कट्टा कार्नर, मोर्येवाडा येथे शिवजयंती उत्सव,बांद्यात विविध मंडळांनी मोठ्या भक्तीभय वातावरणात साजरी करण्यात आली. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स