ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील समस्या जाणून घेण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सह संयोजक डाॅ.अमेय देसाई साहेब यांची भेट
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील समस्या जाणून घेण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सह संयोजक डाॅ.अमेय देसाई साहेब यांची भेट

प्रकाशन: 18 Feb 2023 10:58 PM
वाचन संख्या 45

ब्यूरो चिफ-विवेक परब-शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाच्या अनेक दिवसापासून रुग्णाकडून अनेक विषयांवर तक्रारी येत होत्या यासाठी रेडी जि.प.परिषद भाजप कडून वरिष्ठ पातळीवर समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मागणी होत होती यांची दखल घेऊन आज शनिवार १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता अचानकपणे रेडी जि.प.परिषद भाजप पदाधिकारी सह भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सह संयोजक डाॅ.अमेय देसाई व भाजप सिंधुदूर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली तेथे ज्याच्याकडे उपजिल्हा रुग्णालयांची जबाबदारी असलेले डाॅक्टर उपलब्ध नसल्यामुळे तेथे सेवेत असलेले उपलब्ध डाॅ.पंकज पाटील यांची भेट घेऊन शिरोडा उपजिल्हा रूग्णालयात असलेल्या समस्या जाणून घेऊन त्याबद्दल विस्तृत चर्चा केली व या समस्या दूर करण्यासाठी आरोग्य खात्याची संपर्क करुन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले त्या वेळी शिरोडा उपजिल्हा रूग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु व्हावे यांची सुध्दा मागणी रेडी जि.प.भाजप व शिरोडा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य मयूरेश शिरोडकर यांच्याकडून करण्यात आली
या वेळी रेडी जि.प.माजी सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे,भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शिरोडा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य मयुरेश्वर शिरोडकर, कु.अर्चना नाईक, सौ.हेतल गावडे, भाजप रेडी, शिरोडा, आरवली शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे जगन्नाथ राणे, विदयाधर धानजी, महादेव नाईक, भाजप शिरोडा शहर उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर गुरुजी, अनिल गावडे, बाळकृष्ण परब, भाजप शिरोडा शहर भाजप पदाधिकारी विकास परब, जितेद्र आजगांवकर व भाजप पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित राहून चर्चा केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स