भरणी तळेवाडी येथील १२ शेतकऱ्यांच्या काजू बागेला आग; सुमारे ६० लाखाचे नुकसान
संतोष साळसकर | सहसंपादक: भरणी तळेवाडी येथे आगीच्या भीषण वणव्यामधे सुमारे 12 शेतकऱ्यांच्या 25/30 एकर मधील हजारो काजूची झाडे असलेल्या काजू बागायतीचे सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान.पंचनाम्यावेळी तलाठी कोरगांवकर मॅडम,कृषी सहाय्यक रावराणे मॅडम,पोलीस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर,सरपंच अनिल बागवे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी सुरेश साटम,सोनू पाडावे,विश्वजित दळवी,मंगेश जगताप,सचिन चव्हाण,महेश शेट्ये,रमेश जगताप,दिपक बागवे,संजय सावंत,शांताराम बागवे,पांडू पाडावे,सुयोग पाडावे,अनुसया शेट्ये आदी शेतकरी उपस्थित होते.शासनाकडून या गंभीर नुकसानी बाबत त्वरीत आर्थिक मदत मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली.चालू वर्षाचे काजूपासून मिळणारे उत्पन्न आगीमुळे संपूष्टात आले आहे.आगीमुळे हजारो झाडांचे नुकसान झाल्यामुळे कित्येक झाडे कायमस्वरुपी जळून खाक झाली आहेत.काजू हा एकमेव उत्पन्नाचा व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.तरी आपले स्तरावर याची दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी अशी या शेतकरी वर्गाची मागणी आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)