ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दिल्ली येथे होणाऱ्या  नॅशनल युथ क्लायमेट  कॉन्क्लेव्ह  2023 साठी महाराष्ट्रातून  ऐश्वर्य मांजरेकर व मेगल डिसोजा यांची निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल युथ क्लायमेट कॉन्क्लेव्ह 2023 साठी महाराष्ट्रातून ऐश्वर्य मांजरेकर व मेगल डिसोजा यांची निवड.

प्रकाशन: 18 Feb 2023 09:46 PM
वाचन संख्या 65

मालवण/ प्रतिनिधी : भारतातून १२० युवकांची निवड .मालवण हवामान बदलाचा मुकाबला करण्यात तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे,पृथ्वीचे हवामान नेहमीच बदलत असते. यातील काही बदल नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत जसे की ज्वालामुखीचा उद्रेक, पूर, जंगलातील आग इत्यादी, परंतु त्यापैकी काही मानवी क्रियाकलापांमुळे आहेत. जंगलतोड, जीवाश्म इंधन जाळणे, पशुधन , शेती इत्यादी मानवी क्रियाकलापमुळे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू निर्माण करतात. याचा परिणाम ग्रीनहाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वार्मिंगमध्ये होतो जे हवामान बदलाचे प्रमुख कारण आहेत. नॅशनल युथ क्लायमेट कॉन्क्लेव्हची प्राथमिक भूमिका म्हणजे भारतीय तरुणांना हवामान बदलाच्या मुद्द्यांवर विज्ञान आधारित चर्चेत सकारात्मकतेने आणि सक्रिय मार्गाने सहभागी करून घेणे आणि हवामानाच्या पूर्ततेसाठी भारतातले तरूण व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदलावर काम करणे हे आहे. युरोपियन युनियन व भारत सरकारच्या नेतृत्वात सदर क्लायमेट कॉन्क्लेव्ह होत असून युनिसेफ, GIZ, TERI आणि CEEW , Yuwaah व पर्यावरण व वन मंत्रालय आणि हवामान बदल नोडल मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही परीषद पार पडणार आहे. या वर्षी भारत G20 चा अध्यक्ष आहे, त्या दृष्टीनेही ही परीषद महत्वाची मानली जात आहे. YCC कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय तरुणांमध्ये वातावरण बदल , हवामान , व पर्यावरण वाचवण्याबाबत गंभीर विचार, सर्जनशीलता, वैज्ञानिक समज, संवाद, सहयोग, बहुभाषिकता, समस्या सोडवणे, नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि डिजिटल साक्षरतेने मजबूत करणे हा आहे. या परिषदेमध्ये जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद http://localhost/news/public/uploads/2023 च्या शाश्वत जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या युवा समारंभात सादर केलेल्या ‘युवा प्रतिज्ञा’चा मसुदा तयार करण्याची संधीही तरुणांना मिळेल. उच्च-स्तरीय वक्ते, तरुणांच्या चर्चा आणि मुलाखती, व्हिडिओ संदेश, प्रश्नमंजुषा , एज्युकेशनल फिल्ड ट्रीप , COP 27, G20, Y20 यांची इत्यंभूत महिती इत्यादींसह अनेक कार्यक्रम या परिषदेमध्ये समाविष्ट आहे.नॅशनल युथ क्लायमेट कॉन्क्लेव्ह http://localhost/news/public/uploads/2023 साठी संपूर्ण भारतातून अर्ज मागविण्यात आले होते त्या पैकी 120 तरुणांची निवड करण्यात आली या मध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युथ बिट्स फॉर क्लायमेटस ग्रुप ची संस्थापिका मेगल मार्शेलिन डिसोझा व ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची निवड नॅशनल युथ क्लायमेट कॉन्क्लेव्ह http://localhost/news/public/uploads/2023 साठी झाली असून सदर क्लायमेट कॉन्क्लेव्ह 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2023 रोजी दिल्ली येथे विश्व युवक केंद्र चाणक्य पुरी व सिल्व्हर ओक इंडिया हॅबिटेट सेंटर येथे होणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स