पळसंब ग्रामदेवता श्री जयंती देवी जाणार कुणकेश्वर भेटीस!
ब्यूरो चिफ- विवेक परब : मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामदेवता श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीस शनिवार १८ रोजी प्रस्थान करणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी कुणकेश्वर पायी तीर्थयात्रा सकाळी ८.३० ला चालू होईल. पळसंब जयंती मंदिर येथून प्रारंभ झाला नंतर वायगणकरवाडी, कुडोपी, खुडी येथे दुपारी जेवण व विश्रांती , कोटकामते श्री .भगवती देवी भेट , नारिग्रे, दहिबाव चेक नाका , इळये सडा मार्गे कुणकेश्वर भेटीला रात्री ९ ते १०या वेळेत पोहोचेल. व श्री शैलेश बोडांळे घरी मुक्काम. १९ फेब्रुवारी रोजी कुणकेश्र्वर येथे श्री . शैलेश बोंडाळे व श्री कुणकेश्वरकर यांच्या घरी मुक्काम व विश्रांती.२० फेब्रुवारी रोजी तिर्थस्थान पहाटे ५ वाजता करून श्री .कुणकेश्वर भेट घेवून परतीचा प्रवास चालू होईल. कुणकेश्वर मंदिर, श्री शैलेश बोडांळे घर , कातवण येथे दुपारी जेवण व्यवस्था , मिठबाव श्री . रामेश्वर मंदिर भेट , हिंदळे विठठल रखुमाई मंदिर रात्री 8 वाजता भेट व जेवण, मुणगे श्री भगवती भेट , कारिवणे मार्गे ,आचरा पार ,आचरा तिठा ,चिंदर .त्रिबंक त्यानंतर पळसंब जयंती मंदिर येथे समारोप होईल.तिर्थयात्रेत सहभागी होण्याऱ्या सर्व भक्तजनांनी ट्रस्ट ओळखपत्र व ट्रस्ट ची टोपी घालणे बंधनकारक आहे याची सर्वानी नोंद घ्यावी.उपस्थीतीचे आवाहन श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट पळसंब यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)