ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेना कणकवली तालुका महिला आघाडीतर्फे महाराष्ट्र मास्टरशेफ सौ.आरती वायंगणकर यांचा सत्कार..

शिवसेना कणकवली तालुका महिला आघाडीतर्फे महाराष्ट्र मास्टरशेफ सौ.आरती वायंगणकर यांचा सत्कार..

प्रकाशन: 30 Sep 2021 08:45 PM
वाचन संख्या 120

सिंधुदुर्गच्या आरती परब ठरल्या होत्या महाराष्ट्राच्या द्वितीय क्रमांकाच्या मास्टरशेफ….

कणकवली | उमेश परब : महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा मास्टरशेफ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कणकवलीतील सौ.आरती मकरंद वायंगणकर यांना आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे गौरविण्यात आले होते. या गौरव समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार साहेब, युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री श्री.आदित्यजी ठाकरे साहेब देखील उपस्थित होते.
सौ.वायंगणकर या कणकवली तालुक्यातील आहेत हि अभिमानाची बाब असल्याने शिवसेना कणकवली तालुका महिला आघाडीच्या वतीने त्यांच्या कलमठ येथील निवासस्थानी जाऊन सौ.प्रतिक्षा साटम यांच्या नेतृत्वाखाली शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना कणकवली तालुका महिला आघाडी माजी तालुकाप्रमुख प्रतिक्षा साटम, स्नेहा तेंडुलकर, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, माजी विभागप्रमुख जैबा कुरेशी, कणकवली शाखाप्रमुख मिनल म्हसकर, बोर्डवे शाखाप्रमुख शोभा बागवे, रिद्धी साटम आणि सौ.वायंगणकर यांचे पती मकरंद यांच्यासह सर्व कुटुंबिय उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स