ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
इलेक्ट्रॉनिक मिडिया सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर...!

इलेक्ट्रॉनिक मिडिया सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर...!

प्रकाशन: 30 Sep 2021 08:05 PM
वाचन संख्या 169

अध्यक्षपदी अनुभवी श्री. राजन नाईक तर सचिवपदी कुशल प्रशासक श्री. विकास गांवकर यांची निवड..

मालवण | वैभव माणगांवकर : गेल्या दहा वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मिडियाने उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. प्रिंट मिडियाला पूरक अशी दर्जेदार सामाजिक करणार्या इलेक्ट्रॉनिक मिडिया सिंधुदुर्ग जिल्ह्याची नविन कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली.
कणकवली येथे झालेल्या इलेक्ट्रॉनिक मिडिया सिंधुदुर्ग जिल्हा बैठकीमध्ये अनुभवी इलेक्ट्रॉनिक पत्रकार श्री राजन नाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री विजय गांवकर यांनी चोव्वीस वर्षे अथक पत्रकारीता करणार्या अनुभवी राजन नाईक यांचा अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली.  

नंतर श्री.राजन नाईक यांनी गेली पंचवीस वर्षे पत्रकारिता व दहा वर्षे सृजनशील व कुशल प्रशासक म्हणून सुप्रसिद्ध असणार्या श्री. विकास गांवकर यांचे सचिवपदासाठी नांव सुचविले असता श्री. विकास गांवकर यांनाही सर्वानुमते सचिव म्हणून निवडण्यात आले. खजिनदारपदासाठी श्री विनायक वंजारे यांच्या नावालाही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.सदर कार्यकारणी ही साल http://localhost/news/public/uploads/2026 पर्यंतसाठी म्हणजेच पुढील तीन वर्षांसाठी निवडण्यात आली आहे.
महेश सावंत,विजय गांवकर,राजन नाईक, विकास गांवकर आणि विजय पालकर हे संघटनेचे संस्थापक सदस्य असल्याने ते संस्थेचे आजीवन सभासद असतील असा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
प्रतीवर्षी पत्रकार दिन साजरा करणे , वर्षातून एकदा आदर्श इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकाराची निवड करुन गौरव करणे आणि आदर्श राजकीय नेत्याची निवड करणे अशा उपक्रमांचा ठरावही या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला.ज्यांना इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये  सदस्य व्हायचे असेल त्यांनी अध्यक्ष व सचिव यांच्याकडे त्यांचे प्रस्ताव सादर करावेत असेही बैठकीत ठरविण्यात आले.


आपली सिंधुनगरी चॅनेलचे संस्थापक व मुख्य संपादक श्री सुयोग पंडित व संचालक मंडळातील श्री.विजय रावराणे ,सौ.फिलोमीना पंडित आणि प्रा. दिनेश किडये यांनी श्री राजन नाईक, श्री विकास गांवकर आणि श्री. विनायक वंजारे यांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स