ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे झाले लोकार्पण...

गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे झाले लोकार्पण...

प्रकाशन: 30 Sep 2021 09:06 PM
वाचन संख्या 128

अखिल भारतीय शिक्षक संघाचे सर्वांनी मानले आभार

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : अखिल भारतीय प्राथ.शिक्षक संघ सिंधुदुर्ग यांनी लोकार्पण केलेली अँम्ब्युलन्स मालवण तालुक्यातील गोळवण आरोग्य केंद्राला मिळाली आहे. या रुग्णवाहिकेचा पूजन कार्यक्रम गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी बांधकाम सभापती श्री.संतोष साटविलकर होते. सरपंच सुभाष लाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्या सौ.बांदेकर मँडम, मालवण सभापती श्री.अजिंक्य पाताडे,गोळवण सरपंच श्री.सुभाष लाड, उपसरपंच श्री.गावडे,अखिल भारतीय शिक्षक संघ मालवण तालुका अध्यक्ष श्री गुरुनाथ ताम्हणकर व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवराज सावंत,आरोग्य आधिकारी, डाँक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच बहुसंख्य गोळवण ग्रामस्थ उपस्थित होते. सुमारे आठ लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका दिल्या बद्दल सर्व मान्यवरांनी शिक्षक संघाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स