आज मुणगे तिठा येथे रिक्षा चालक-मालक संघाच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेचे तीर्थ प्रसाद वाटप सुरु ; संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे येथील रिक्षा चालक-मालक संघाच्या वतीने आज ७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता श्री भगवती हायस्कूल तिठा येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता आरती व तीर्थ प्रसाद कार्यक्रम सुरु असून संध्याकाळी ७ ते ९ स्थानिक भजने, रात्री दहा वाजता ओंकारा ग्रुप मालवण यांचा सोलो डान्स, ग्रुप डान्स, मिमिक्री, तुफान विनोदी नाटिका अशा विविध बहारदार कलाकृतीने नटलेला ‘कलाविष्कार नव्या युगाचा नव्या दमाचा’ हा व्हरायटी शो होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रिक्षा चालक-मालक संघ मुणगे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)