ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री संत शिरोमणी रविदास महाराजांचा ६५० वर्षांपूर्वी दिलेला समानतेचा विचार घेऊन सर्वांनी चालावे : युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री संत शिरोमणी रविदास महाराजांचा ६५० वर्षांपूर्वी दिलेला समानतेचा विचार घेऊन सर्वांनी चालावे : युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक.

प्रकाशन: 07 Feb 2023 11:44 AM
वाचन संख्या 88

कणकवलीत श्री संत रविदास शिरोमणी जयंती उत्सव मिरवणुक उत्साहाने संपन्न.

चर्मकार समाजाचे नेते सुजित जाधव यांनी श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांचा पुतळा पंचायत समिती समोरील जागेत उभा करायची केली मागणी.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात रविवारी ५ फेब्रुवारीला श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव साजरा झाला. जयंती उत्सवाच्या मिरवणुकीत सर्व सामाजिक घटकांनी सहभाग घेतला. श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांनी ६५० वर्षांपूर्वी दिलेला समानतेचा विचार घेऊन सर्वांनी चालले पाहिजे असे सामाजिक आवाहन व उद्गार युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी काढले.

चर्मकार समाजाचे नेते सुजित जाधव यांनी नगरपंचायत विरोधी गट नेते तथा नगरसेवक सुशांत नाईक यांच्याकडे कणकवली शहरात श्री. संत शिरोमणी रविदास महाराज यांचा पुतळा पंचायत समिती समोरील जागेत उभा करावा अशी मागणी केली.
तेव्हा सुशांत नाईक यांनी माननीय खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या माध्यमातून लवकरच शासन दरबारी मागणी करायचा आपण प्रयत्न करू असे आश्वासन देऊन दिले. नंतर पालखी मध्ये सहभाग घेत त्यांनी आपण चर्मकार समाजा सोबत कायम आहोत असे सांगितले.

या मिरवणुक सोहळ्याला त्यांच्या सोबत शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा चर्मकार समाज जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव, विजय चव्हाण, पंढरी जाधव, प्रकाश वाघेरकर, आनंद जाधव, जाधव आणि असंख्य चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स