ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचारसंहिता संपताच  ग्रामपंचायत सदस्य काळे दांपत्य 'बॅक इन ॲक्शन…!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचारसंहिता संपताच ग्रामपंचायत सदस्य काळे दांपत्य 'बॅक इन ॲक्शन…!'

प्रकाशन: 05 Feb 2023 03:53 PM
वाचन संख्या 151

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी दिले निवेदन.

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या सडूरे-शिराळे ग्रामपंचायतचे पुनर्निर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे आणि त्यांच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या पत्नी सौ.विशाखा नवलराज काळे या दांपत्याने आचारसंहीतेचा कालावधी संपताच त्यांच्या सामाजिक व राजकीय कामाचा धडाका सुरु केला आहे.

सध्या ‘मानव विकास योजना’ या अंतर्गत चालू असलेली सकाळची गाडी शिराळे गावा पर्यंत सोडावी आणि शिराळे गावासहीत सोनधरने, तांबळघाटी रुणझुणेवाडीतील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशा संबंधी ग्रा.पं. सदस्य नवलराज काळे व सदस्या सौ.विशाखा काळे नुकतीच लागू असलेली आचारसंहिता संपताच काळे दांपत्ये यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अडचणी जाणून घेत सर्वात प्रथम विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वाहतूक विभागीय कार्यालय कणकवली येथे मानव विकास योजनेअंतर्गत चालू असलेली वैभववाडी सडूरे ही गाडी शिराळे गावात सोडावी व शिराळे गावासहीत सोनधरने, तांबळघाटी रुणझुणेवाडीतील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

श्री नवलराज विजयसिंह काळे हे प्रभाग तीन चे ग्रामपंचायत सदस्य आहेत तर सौ.विशाखा नवलराज काळे ह्या प्रभाग क्रमांक दोनच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत या दोन्ही प्रभागात येणाऱ्या शिराळे गावा सहित इतर ३ वाड्यातील विद्यार्थ्यांना सकाळी नऊची एसटी सडूरेतून जात असल्यामुळे पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून सडूरे येथे गाडीसाठी यावे लागते व तसे न केल्यास दुसऱ्या गाडीने कॉलेजला जावयाचे असल्यास कॉलेजला जायला उशीर होतो. परिणामी सुरुवातीचे एक दोन लेक्चर्स विद्यार्थ्यांना मिळत नाही. काहींचे एक्स्ट्रा क्लासेस असतात त्यांना सुद्धा हजेरी लावता येत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या काही विषयांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे शैक्षणिक नुकसान वाचवायचे असल्यास मानव विकास योजनेंतर्गत चालू असलेली सकाळी ९ वाजताची बस ही व्हाया शिराळे गावातून वैभववाडीला जावी अशी त्यांची मागणी आहे. तसे झाल्यास नियोजित वेळेत विद्यार्थी आपल्या कॉलेजला पोहोचू शकतात.

ही बस चालू करण्यासाठी शिराळे सहित उर्वरित ३ वाड्यांतील जनतेची आपल्याकडे सातत्याने मागणी होत आहे व जनतेच्या वतीने आम्ही आपल्या विभागाकडे ही गाडी चालू करण्याची विनंती करीत आहोत अशा आशयाचे निवेदन ४ फेब्रुवारी २०२३ ला ग्रा. पं. सदस्य नवलराज काळे व सौ विशाखा काळे यांनी ट्राफिक डिव्हिजन कणकवली कार्यालयात लिखित स्वरूपात दिले आहे. निश्चितपणाने गाडी चालू झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असलेले वाचेल. आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते ते पहाणे औत्सुक्याचे ठरेल .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स