महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्या वतीने दिंडोरी येथे तालुकानिहाय बैठक उपक्रमाचा शुभारंभ ; नाभिक समाजाची राजकीय पटलावरील क्षमता दाखवायचा निश्चय.
प्रदेश सचिव राजाभाऊ नारकर व प्रदेश अध्यक्ष विजय उर्फ आप्पा पंडित विशेष उपस्थित.
मालवण | सुयोग पंडित : राज्यातील ‘महाराष्ट्र राज्य सलून आसोसिएशन’ च्या वतिने नाशिक जिल्ह्यातील तालुका निहाय बैठका घ्यायच्या उपक्रमाचा शुभारंभ काल ४ फेब्रुवारीला ‘दिंडोरी’ तालुक्यातील नाभिक समाज बांधवांच्या बैठकीने झाला.
या बैठकीला प्रदेश सचिव राजाभाऊ नगरकर व प्रदेश अध्यक्ष विजय पंडित, भरत सोनवणे, कीर्तन कार किशोर जगताप , हेमंत पंडित, देविदास बिडवे ,मयुर जगताप, कृष्णा वाघ सौरभ बिडवे, दिपक पंडित, करण पंडित आणि इतर सामाजीक बांधव वर्ग उपस्थित होता.वरील सर्वाना नाशिक जिल्हा गट निहाय व तालुका निहाय पदांचे वाटप तथा जबाबदारी देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष
श्री विजय ऊर्फ अप्पा पंडित यांनी उपस्थित सर्वांनाच संबोधीत करताना त्यांच्या भाषणात म्हणले की महाराष्ट्रात ४० ते ५० लाख एवढा नाभिक समाज आहे. परंतु समाजाचा एक सुध्दा आमदार, खासदार किंवा मंत्री नाही त्या मुळे संसदेत व विधानसभेत आपल्या अडचणी व समस्या संपूर्ण ताकदीने मांडता येत नाहीत म्हणूनच आपल्याला आपल्या समाजाची एकता व सामर्थ्य दाखवायसाठी आपण राज्यस्तरीय आधिवेशन घेण्याचे ठरविले आहे. समाजातील एक प्रमुख घटक असलेल्या आपल्या नाभिक समाजासाठी योग्य सामाजिक व राजकीय नियोजन करायचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)