सिंधुदुर्ग जिल्हा श्री.विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार ; झाराप येथे श्री. विश्वकर्मा जयंती कार्यक्रमाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट.
आ. वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा श्री. विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या उपक्रमांचे केली विशेष प्रशंसा.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या झाराप येथे ‘सिंधुदुर्ग जिल्हा श्री.विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ’ च्या वतीने झाराप येथे श्री.विश्वकर्मा जयंती आज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. याप्रसंगी समाज मंडळाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी आ. वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा श्री. विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करत समाजासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, सिंधुदुर्ग जिल्हा श्री. विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाचे अध्यक्ष शरद मेस्त्री, नारायण मेस्त्री, अश्फ़ाक कुडाळकर, स्वप्नाली मेस्त्री, माजी सरपंच प्रभाकर मेस्त्री, मंडळाचे माजी अध्यक्ष आनंद मेस्त्री, माणगांवकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)