ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
शेर्ले-मडुरा-सातार्डा रस्त्याचे मंजूर झालेले काम सा.बां. विभागाकडून सुरू करायला दिरंगाई होत असल्याने आंदोलन करणार ; मडुरे उपसरपंच बाळू गावडेंचा लेखी इशारा.

शेर्ले-मडुरा-सातार्डा रस्त्याचे मंजूर झालेले काम सा.बां. विभागाकडून सुरू करायला दिरंगाई होत असल्याने आंदोलन करणार ; मडुरे उपसरपंच बाळू गावडेंचा लेखी इशारा.

प्रकाशन: 03 Feb 2023 07:03 PM
वाचन संख्या 95

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘खामदेव नाका इन्सुली (जुना आरटीओ) व्हाया शेर्ले-मडुरा-सातार्डा’ या रस्त्याचे काम शासनदरबारी मंजूर झालेले आहे तरिही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू करण्यास दिरंगाई होत आहे. हे मंजूर काम वेळेत न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता असल्याने हे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा १५ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा लेखी इशारा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला आहे.

मडुरा रेखवाडी येथे रस्ता दुरुस्तीचे किरकोळ काम सुरू आहे. परंतु ‘खामदेव नाका इन्सुली (जुना आरटीओ) ते वाया शेर्ले-मडुरा-सातार्डा’ रस्त्याचे काम मंजूर असून सार्वजनिक विभागाकडून दिरंगाई का होत आहे. निधीची तरतूद करण्यासाठी आम्हाला अनेक फेऱ्या आमदार, खासदार तसेच मंत्र्यांकडे माराव्या लागतात. त्याचवेळी आम्ही गावात निधी आणू शकतो, मात्र आणलेला निधी योग्य वेळेत खर्च होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत सदर रस्त्याचे काम मंजूर असून काम वेळेत न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता असल्याचे उपसरपंच बाळू गावडे यांनी निदर्शनास आणून दिले. प्रत्यक्ष काम सुरु करायची कार्यवाहीची हमी ८ दिवसांत लेखी स्वरुपात न मिळाल्यास १५ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी येथे गावातील नागरिक तसेच परिसरातील सहकाऱ्यांसोबत बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा लेखी इशाराही उपसरपंच बाळू गावडे यांनी दिला.

यावेळी कुठलाही अनुचित् प्रकार घडला किंवा आरोग्याला हानी पोचली तर त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स