कुडाळची विक्रम विरांगना कु. शमिका चिपकर हिचा वर्ल्ड रेकॉर्डस इंडियाकडून सन्मान.
ब्यूरो चीफ | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या १२ वर्षीय मुलीने १० तास ३१ मिनिटे ११ सेकंदात, ४० किलोमीटर समुद्री अंतर यशस्वीरित्या पोहून तिचे नांव वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंदवले. तिच्या या शौर्याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या संस्थेचे वरिष्ठ प्रतिनिधी सुषमा नार्वेकर आणि संजय नार्वेकर यांनी घेतली आहे. कु. शमिका चिपकर ही कुडाळ शहरातील लक्ष्मी वाडीतील निवासी असून कुडाळ हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत आहे. ती दीर्घ पल्याची जलतरणपटू आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती पोहण्याचे धडे प्रशिक्षक श्री दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बीच येथील समुद्रात ४० किलोमीटर अंतर कमीत कमी वेळात म्हणजेच १० तास ३१ मिनिटे व व ११ सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा अतुलनीय विक्रम तिनै प्रस्थापित केला आहे.
‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’ या विक्रम मानांकन प्रणालीचे विशेष प्रतिनिधी सुषमा नार्वेकर व संजय नार्वेकर हे समाजातील वैशिष्ट्यपूर्ण चमकदार कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ देण्याचे काम करीत आहेत व सहकार्य ही करत आहेत. आत्तापर्यंत विविध कार्यक्षेत्रातील प्रत्येक स्तरावरील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना उत्तेजन द्यायचे काम आतापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ काम केलेल्या आणि राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार मिळवलेल्या सुषमा नार्वेकर यांनी केले आहे. याबाबती शमिकाच्या विक्रमाची माहिती मिळतात त्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. कुडाळ हायस्कूल मध्ये संस्था कार्याध्यक्ष मा.भाईसाहेब तळेकर तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत व रेकॉर्ड ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी सुषमा नार्वेकर आणि संजय नार्वेकर यांच्यामार्फत तिला मेडल प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन शमिकाचा सन्मान करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)