ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात ६ फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा उत्सवाचे आयोजन ; पालखी सोहळ्यात दिंडी पथकांचा विशेष सहभाग.

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात ६ फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा उत्सवाचे आयोजन ; पालखी सोहळ्यात दिंडी पथकांचा विशेष सहभाग.

प्रकाशन: 02 Feb 2023 12:21 PM
वाचन संख्या 49

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने ६ फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदा उत्सव वटवृक्ष मंदिरात साजरा होत आहे. या निमित्त पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती, सकाळी ०८:३० वाजता ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते गुरूजी मोहनराव पुजारी व मंदार महाराज व सहकाऱ्यांच्या मंत्रोच्चारात देवस्थानचे रूद्राभिषेक, ११:३० वाजता महानैवेद्य आरती संपन्न होईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने भक्तनिवास येथील भोजन कक्ष येथे भोजन महाप्रसाद देण्यात येईल. सायंकाळी ५ ते रात्री ०९:३० या वेळेत वटवृक्ष मंदिरातून फत्तेसिंह चौक, मेन रोड, कापड बाजार, कारंजा चौक, बुधवार पेठ, समाधी मठ, परतीचा मार्ग बुधवार पेठ, कारंजा चौक, साऊथ पोलीस स्टेशन समोरून मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरू मंदीर मार्गे भारत गल्ली, देशमुख गल्ली, स्वामी गल्लीतून वटवृक्ष मंदिर अशा पालखी मार्गाने भजन, दिंड्यांसह सवाद्य निघणारा पालखी सोहळा परंपरेनुसार संपन्न होईल.

या पालखी सोहळयात लातूर, उस्मानाबाद जिल्हयातील दिंडी पथकांचा समावेश असेल. रात्री साडे नऊ वाजता पालखी सोहळा पुन्हा वटवृक्ष मंदिरात विसावेल आणि पारंपारिक भजन सेवा होईल. यानंतर देवस्थान समितीकडून शिरा प्रसाद वाटप होवून श्री गुरूप्रतिपदा उत्सवाचा सांगता समारंभ होईल. तरी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांच्या दर्शनाचा भोजन महाप्रसादाचा व पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखी सोहळा व श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स