ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक यांनी महादेवाचे केरवडे येथील शोकाकुल कै.जिजाबाई देवळी यांच्या परिवाराचे केले सांत्वन.

आमदार वैभव नाईक यांनी महादेवाचे केरवडे येथील शोकाकुल कै.जिजाबाई देवळी यांच्या परिवाराचे केले सांत्वन.

प्रकाशन: 28 Jan 2023 08:28 PM
वाचन संख्या 130

शासकीय मदत मिळवून द्यायचा दिला आश्वासक दिलासा.

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे महादेवाचे टेंब येथील राहणाऱ्या जिजाबाई तुकाराम देवळी (वय ६२) यांचा २६ जानेवारीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने भाजून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

कै. जिजाबाई देवळी कुटुंबियांवर या घटनेने मोठा आघात झाला असून आज कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सीताराम देवळी आणि देवळी कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. शासकीय मदत मिळवून देण्याचा आमदार वैभव नाईक यांनी देवळी कुटुंबीयांना आश्वासक दिलासाही दिला.

यावेळी श्रेया परब, रामभाऊ धुरी, कृष्णा धुरी, योगेश धुरी, अमित राणे, तुषार परब, बच्चू नाईक, निलेश सावंत, महेश राऊळ, गुरुदेव पंदारे, श्रीकृष्ण नेवगी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स