ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदा येथे '१०८ सूर्यनमस्कार शिबीर' संपन्न ; आंतरराष्ट्रीय सूर्यनमस्कार दिन तथा रथसप्तमीचे औचित्य.

बांदा येथे '१०८ सूर्यनमस्कार शिबीर' संपन्न ; आंतरराष्ट्रीय सूर्यनमस्कार दिन तथा रथसप्तमीचे औचित्य.

प्रकाशन: 28 Jan 2023 04:04 PM
वाचन संख्या 74

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पतंजली योग समिती बांदा आणि पतंजली योगसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा च्या भव्य पटांगणावर आज ‘१०८ सूर्यनमस्कार शिबिर’ संपन्न झाले.

आंतरराष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनाचे अर्थात रथसप्तमीचे औचित्य साधून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उद्घाटक म्हणून बांदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्यामराव काळे आणि अध्यक्ष म्हणून शिक्षण तथा आरोग्य सभापती प्रमोद कामत उपस्थित होते.

त्यावेळी पतंजली योग समिती सिंधुदुर्ग चे सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर, बांदा ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नाईक , व्ही एन नाबर चे मुख्याध्यापक सौ मनाली देसाई,भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी महेश भाट, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी सुभाष गोवेकर, लक्ष्मण पावसकर, प्रियांका हरमलकर, दत्तात्रय निखार्गे, उत्तम देसाई, अभिलाष देसाई आदी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर १०८ सूर्यनमस्कारांचे शिबीर शेखर बांदेकर यांनी घेतले. याशिबिराला पतंजली योगसमिती बांदा आणि पतंजली योगसमिती डेगवेचे सर्व साधक उपस्थित होते तसेच खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, व्ही एन नाबर स्कूल आणि बांदा क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल च्या व्यवस्थापकांनी सदर शिबिरासाठी लागणारे स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. योगाभ्यास करणे ही काळाची गरज आहे असे प्रमोद कामत यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स