ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सातरल-कासरल मध्ये ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या नेत्र तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद.

सातरल-कासरल मध्ये ह्यूमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या नेत्र तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद.

प्रकाशन: 28 Jan 2023 09:54 AM
वाचन संख्या 269

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळा सातरल कासरल या ठिकाणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ४९ नेत्र रुग्णांनी लाभ घेतला.

या शिबिराचे आयोजन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व लायन्स आय हॉस्पिटल कणकवली, तसेच सातरल कासरल तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. त्यावेळी उपस्थित सरपंच सौ. मेस्त्री, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, त्याचप्रमाणे ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर, तालुका अध्यक्ष सौ. संजना सदडेकर, सचिव मनोज वारे, उपाध्यक्ष सदाशिव राणे, निरीक्षक प्रवीण गायकवाड, तसेच निवृत्त नायब तहसीलदार तथा संघटनेचे जनसंपर्क अधिकारी साईनाथ गोसावी व शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, डॉक्टर. मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच आय हॉस्पिटल नेत्रालयचे डॉक्टर अशोक कदम, ऋषिकेश कोरडे, स्पेक्टोमार्टचे श्री व सौ मंगेश चव्हाण उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स