ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
संत रविदास महाराज जयंती उत्सवाला चर्मकार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : सुजित जाधव यांचे आवाहन.

संत रविदास महाराज जयंती उत्सवाला चर्मकार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : सुजित जाधव यांचे आवाहन.

प्रकाशन: 27 Jan 2023 10:06 PM
वाचन संख्या 90

५ फेब्रुवारीला कणकवलीत साजरी होणार संत रविदास जयंती.

कणकवली | प्रतिनिधी : चर्मकार बांधवांचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव यांनी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रकारे प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज बांधव यांच्या वतीने संत रविदास महाराज जयंती उत्सव रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ कणकवली येथे साजरी करण्याचे आयोजित करण्यात आले आहे. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या सभेला जिल्ह्यातील सर्व चर्मकार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. ही सभा कणकवलीत अध्यक्ष सुजित जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.

सभेत जिह्यातील समाज बांधव आपला समाज एकसंघ व्हावा या उद्देशाने एकत्र आले होते. त्यानुसार या सर्वांच्या उपस्थितीत महत्वाच्या विषयांवर चर्चा करून संत रविदास महाराज जयंती उत्सवाचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये उपस्थित सर्वांचे सहकार्य मोलाचे होते. त्यामध्ये रविंद्र पावसकर, पंढरी जाधव, देवेंद्र कसालकर, अंकुश किंजवडेकर, सुभाष जाधव, बाबल नांदोस्कर, प्रसाद मसुरकर, मयूर चव्हाण, आनंद जाधव, अनिल चव्हाण, प्रथमेश जाधव, दीपक जाधव, अमित जाधव, सुदर्शन तेंडोलकर, सौ.मानसी चव्हाण, रघुनाथ चव्हाण, प्राजक्त चव्हाण, सुंदर जाधव, मंजीत जाधव, मंगेश आरेकर, प्रसाद पाताडे आदी उपस्थित होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने संत रविदास महाराज जयंती उत्सव कृती समिती स्थापन करण्यात आली यामध्ये समिती प्रमुख विजय चव्हाण, सुजित जाधव, सौ.मानसी चव्हाण, महानंद चव्हाण, चंद्रसेन पाताडे, छोटू कदम, विठ्ठल चव्हाण, सी. आर. चव्हाण, तुळशीदास पवार, भरत पेंडुरकर, अंकुश चव्हाण, प्रकाश वाघेरकर, राजेंद्र चव्हाण, अनिल जाधव, महेंद्र चव्हाण आदींची कृती समितीवर सूचक पद्धतीने निवड करण्यात आली आहे. वरील सर्व समिती पदाधिकारी व सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे. तसेच या कार्यक्रमाचे ठिकाण लवकरच सर्वांना कळविण्यात येईल, आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज व सुजित जाधव यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स