मसुरे येथे उद्या २८ जानेवारीला 'अक्षर जागर' कार्यक्रम.
मसुरे | प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखा आणि आर.पी.बागवे हायस्कुल सांस्कृतिक समिती, मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आर पी बागवे हायस्कुल मसुरे येथे “अक्षर जागर” या कार्यक्रमाचे आयोजन २८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते १२ यावेळेत करण्यात आले आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद मालवण व मसुरा विभागाचे मान्यवर कवी, कवयित्री, बाल साहित्यिक विद्यार्थी यांचा यावेळी सहभाग असणार आहे. अभिवाचन, काव्यवाचन,काव्यगायन, यासह अन्य कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर, उपाध्यक्ष श्री गुरुनाथ ताम्हणकर यांची आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध मालवणी कवी तथा कोमसाप सदस्य रुजरिओ पिंटो यांच्या हस्ते कार्यक्रम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ सरोज परब, यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रसंगी आर पी बागवे हायस्कुल लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, प्रमुख मान्यवर कोमसाप आजीव सदस्य सदानंद कांबळी,मुख्याध्यापक किशोर चव्हाण,मुख्याध्यापक भरतगड हायस्कूल क्र. २ श्री एस आर कांबळे, आर. पी .बागवे हायस्कुल सांस्कृतिक कार्यक्रम कार्याध्यक्षा सौ वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, श्री विठ्ठल लाकम,संस्कृतिक समिती सचिव सौ अर्चना कोदे,श्री एस. बी .ठाकूर उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)