ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कोमसाप मालवण व कथामाला मालवणचा 'वर्षानंदमेळा २०२५' उत्साहात.

कोमसाप मालवण व कथामाला मालवणचा 'वर्षानंदमेळा २०२५' उत्साहात.

प्रकाशन: 01 Jul 2025 11:02 AM
वाचन संख्या 430

मालवण | प्रतिनिधी : कोमसाप मालवण व कथामाला मालवण आयोजित ‘वर्षानंदमेळा २०२५’ कार्यक्रम रविवार, २९ जून रोजी डॅफोडिल्स रिसाॅर्ट, आचरा येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जि. प. उप शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, कोमसाप केंद्रीय प्रतिनिधी रुजारिओ पिंटो, दत्तात्रय हिर्लेकर , शरयू घाडी व नागेश घाडी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. माधव गावकर यांनी नांदी सादर केली.

त्यानंतर रुजारिओ पिंटो, रामचंद्र आंगणे, दत्तात्रय हिर्लेकर, शरयू घाडी, नागेश घाडी, रश्मी आंगणे, रविंद्र वराडकर, कु. यशदा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रुजारिओ पिंटो यांनी दत्तात्रय हिर्लेकर गुरुजींवर व रश्मी आंगणे यांनी राष्ट्रीय बाल श्री पुरस्कार प्राप्त कै. प्रसाद घाडी यांच्यावर केलेल्या कविता सादर केल्या. तसेच कोमसाप अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचा ‘बोलतो मराठी’ या सदरासहित अमृतमहोत्सवी सदर सादर केल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. यानंतर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण, शिवाजी वाचन मंदिर मालवण, एस. के. काझी वाचनालय आचरा, ज्ञानदीप वाचनालय वायंगणी, माळगाव पंचक्रोशी या वाचनालयांना शरयू घाडी यांच्या सौजन्याने ग्रंथदान करण्यात आले.

गायक विनय वझे यांनी मंगेश पाडगावकर यांच्या गाण्यांचे सादरीकरण केले. यावेळी मधुरा वझे यांनी निवेदन करत तबला वेदांत चिंदरकर आणि पेटीवर सोहम चिंदरकर यांनी साथ देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी गायक विनय वझे व मधुरा वझे यांचा चंद्रशेखर धानजी व उज्वला धानजी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यानंतर नवोदित कवींचे काव्य संमेलन संपन्न झाले. यावेळी श्रावणी प्रभू, अशोक आठलेकर, योगेश मुणगेकर, मधुरा वझे, सुधीर गोसावी, सानिका पालव, नारायण धुरी, ऋतुजा केळकर व अर्चना जोशी यांनी काव्य सादरीकरण केले. तसेच सुप्रसिद्ध कवी रुजारिओ पिंटो व सुनंदा कांबळे यांनी देखील काव्य सादरीकरण केले. त्यानंतर सहा गट करत साहित्यिक स्पर्धा घेण्यात आली. या खेळाचे कोषाध्यक्ष पांडुरंग कोचरेकर यांनी आयोजन केले होते.

दुपारच्या सत्रात कोमसाप सल्लागार तथा कथामाला मालवणचे उपाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी शंखनाद करत सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरूवात झाली. यावेळी सुनंदा कांबळे व कुमार कांबळे यांनी मुलाखत प्रहसन, सदानंद कांबळी, चंद्रशेखर धानजी व उज्वला धानजी, आदिती मसुरकर तसेच विनोद कदम यांनी नाट्यछटा, विजय चौकेकर यांनी ॲक्शन साॅंग, मधुरा माणगांवकर यांनी बातमीपत्र, मनाली फाटक यांनी गजाल कथन, अर्चना कोदे यांनी प्रहसन तसेच सुगंधा गुरव यांनी अभिनय सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी केले. त्यानंतर साहित्यिक खेळातील विजेत्या संघाला कोमसाप कथामालाचा ‘वर्षानंदमेळा’ करंडक देण्यात आला. यावेळी ‘विठूचा गजर हरी नामाचा’ हे वारकरी गीत गात कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह सुनंदा कांबळे, कुमार कांबळे, चंद्रहास हिर्लेकर, लक्ष्मणराव आचरेकर, सुरेश गावकर, संजय परब, सायली परब, विठ्ठल लाकम, देवयानी आजगावकर, त्रिंबक आजगावकर, अदिती मसुरकर, ऋतुजा केळकर, वीणा ठाकूर, सुधीर गोसावी, अमृता मांजरेकर, मंदार सांबारी, अर्चना कोदे, उज्वला धानजी, चंद्रशेखर धानजी, रमाकांत शेट्ये, रामचंद्र कुबल, विजय चौकेकर, निलेश सरजोशी, तात्या भिसळे, बागडे यांसह कोकण मराठी साहित्य परिषदेचे व कथामाला मालवणचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसापचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष पांडुरंग कोचरेकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स