कला शिक्षक समीर चांदरकर यांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार प्रदान.
ब्यूरो न्यूज : वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा प्रशालेचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांना ‘माझी शाळा माझा फळा समुह’ आणि ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपेंट ट्रस्ट’ (बारामती) यांच्यावतीने आयोजित संमेलनातील अक्षर सन्मान सोहळ्यात, राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. बारामती (शारदानगर) पुणे येथे हे ४ थे राज्यस्तरीय ‘अक्षर संमेलन’ संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार रोहित राजेंद्र पवार, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त माननीय सुनंदाताई पवार, महाराष्ट्र पट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महसूल व वन विभागाचे सहसचिव संजय इंगळे, मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव कैलास बिलोणीकर, गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट, उपसचिव चेतन निकम, संयोजक अमित भोरकडे, ज्येष्ठ कार संतोष लोणकर आदी उपस्थित होते.
‘पद्मश्री अच्युत पालव सुलेखन प्रात्यक्षिक व मार्गदर्शन, सुलेखन कला , फलक लेखन, व्यक्ति रांगोळी, गालीचा रांगोळी, फेस पेंटिंग, छत्रीवर सुलेखन, प्रदर्शन अशा विविध कलांनी नटलेले हे संमेलन संस्मरणीय होते,’ अशी ह्या संमेलनाबद्दलची प्रतिक्रिया समीर चांदरकर यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)