चाफेड - भोगलेवाडीतील श्री गायगोठण मंदिरात २५ जानेवारीला माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या चाफेड-भोगलेवाडी येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात बुधवारी दि. २५ जानेवारीला माघी गणेश जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता धार्मिक विधी, मंञपुष्पाजंली ,दुपारी १२ वाजता महाप्रसाद, दुपारी १२ ते २ श्री सत्यनारायण महापुजा,सांयकाळी ५ वाजता नामांकित सुस्वर भजने,राञी १२ वाजता सिद्धेश कलिंगण प्रस्तुत पौराणिक नाट्यप्रयोग, २६ जानेवारी रोजी पहाटे ५.३० वाजता काकड आरती व उत्तरपूजा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सोहळ्याला सर्व ग्रामस्थ, गणेश भक्तांनी, उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन श्री गायगोठण गणपती मंडळ चाफेड-भोगलेवाडी देवस्थान समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ कांडर, उपाध्यक्ष महेश भोगले, खजिनदार सत्यवान कांडर, सरचिटणीस सत्यवान भोगले यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)