पळसंब गावात उद्या संकल्प युवा पिढी घडविण्याचा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
श्री.जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांचा उपक्रम.
विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावातील पाचवी ते उच्च शिक्षित असणाऱ्या सर्व तरुण तरुणीं साठी श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ प्रत्येक महिन्यातील एका रविवारी ‘मार्गदर्शन शिबिर’ हा उपक्रम राबवत आहे. या शिबिराला मार्गदर्शन साठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गावातील युवा वर्गाने याचा लाभ घेवून भविष्यातील उद्योजक तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडविण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करत आयोजकांनी निमंत्रण दिले आहे. मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत आणि खजिनदार, पदाधिकारी व माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी मंडळाच्या वतीने या शिबिराला जास्तीतजास्त प्रतिसाद मिळवून आपल्या गावाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहूया असा या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला आहे.
उद्या २२ जानेवारीला पळसंब शाळा नं. १ येथे १० ते १२ असे हे शिबिर असून याला श्री. एकनाथ मारुती गायकवाड ( एम ए बि एड, जनता विद्या मंदिर त्रिंबक
अनेक राज्य स्तरीय पुरस्कार मिळालेले उत्तम साहित्यिक , गजलकार , कवी ) यांची प्रमुख मार्गदर्शन उपस्थिती असणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)